नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी असून पीएफवरील व्याजदर घटण्याची शक्यता आहे. ईपीएफओकडून पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच पीएफच्या व्याजदरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा व्याजदर कपातीचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस, लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेच्या समस्या वाढत असताना दुसरीकडे बचतीवरील व्याजदर कमी होत असल्याचं चित्र आहे. गुंतवणूकीवरील परतावा सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे भविष्य निर्वाह निधी व्याजदर कमी करण्याचा विचार केला जात आहे. हे व्याज आधी ८.६५ टक्के होतं, जे मार्च महिन्यात कमी करुन ८.५० टक्के करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा व्याजदर कमी करण्याचा विचार केला जात आहे. __भविष्यातील अर्थिक तरतुदींसाठी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी हा फंड महत्वाचा मानला जातो. या फंडामध्ये कर्मचाऱ्याचे आणि कंपन्यांचे पैसे जमा होत असतात. त्याचबरोबर त्यावर चांगले व्याजही मिळत असते. त्यामुळे भविष्यातील अर्थिक तरतुदीच्या दृष्टीने हा फंड महत्वाचा असतो. मात्र, आता या फंडावर मिळणाऱ्या व्याजदारत कपात होणार असल्याने सर्व नोकदार वर्गासाठी ही चिंतेची बाब आहे.
*नोकरदारवर्गासाठी महत्त्वाची बातमी *