आता भाजीपाला मिळणार स्वस्त आणि घरपोच

पुणे : पुणेकरांना रोज ताजी भाजी मिळावी, यासाठी थेट शेतकऱ्यांमार्फतच मालाची विक्री करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे जिल्हा आणि अन्य काही भागांतील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे भाजीपाला काही प्रमाणात स्वस्तही मिळेल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी सांगितले. पालेभाज्या पुरविणारे शेतकरी, शेतकरयांचे गट, आडते आणि हमालांशी चर्चा केल्यानंतर पुणेकरांना रोज त्या-त्या भागांत भाजी पुरविण्याच्या उपक्रमाला आतता शनिवारपासून .२८) सुरवात होईल. त्यामुळे पुणेकरांना आठवडे बाजाराच्या ठिकाणांसह मंडई, काही क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारात रोज भाजी मिळेल. मात्र, रोजच फळ, पालेभाज्या आणि मिळणार असल्याने लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अजूनही पुढील दिवस'लॉकडाऊन' असल्याने भाजीपाला मिळणार नसल्याच्या शक्यतेने लोक संभ्रमावस्थेत आहेत. परिणामी, गुलटेकडी येथील मार्केट यार्डासह विविध मंडईत भाजी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. ती टाळण्यासह लोकांना घराजवळ पुरेशा प्रमाणात भाजी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.