वुहान : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. यातच आता चीनमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. चीनने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी एक लस तयार केली आहे. १७ मार्चला त्यांनी या लसीचे माणसांवर प्रयोग करायलाही सुरुवात केली होती. या लसीचे चांगले परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. __ चेन व्ही आणि त्यांच्या चमूने तयार केली आहे. ज्या १०८ जणांवर या लसीचे परीक्षण सुरू आहे ते सर्वजण १८ ते ६० वर्ष वयातील आहेत. या सर्वांना तीन गटांत विभागण्यात आले होते. या तीनही गटातील लोकांना संबंधित लस वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या दिवशी देण्यात आली. तसेच त्यांना वुहानमधील विशेष सेवा आरोग्य केंद्रात क्वारनटाईन करण्यात आले होते. त्यांना त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होईपर्यंत तेथेच राहावे लागणार आहे.
कोरोना व्हॅक्सीनचा प्रयोग यशस्वी : चीनने केली लस तयार