शिर्डी : महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन असतानाही बाबांवरील श्रद्धेपोटी साईभक्तांनी ऑनलाइन देणग्या देणं सुरू ठेवलं आहे. ३ एप्रिलपर्यंत साई संस्थानला एक कोटी ९० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. देशात लॉकडाऊन होण्याआधीच राज्यातील अनेक देवस्थानांनी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शिर्डीच्या साई संस्थानानंही सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून १७ मार्चपासून मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. दर्शन सोडाच, लॉकडाऊननंतर साईभक्तांना शिर्डीला येणं अशक्य आहे. असं असलं तरी साईभक्तांनी ऑनलाइन पद्धतीनं देणगी देणं सुरूच ठेवले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
लॉकडाऊन असूनही शिर्डी संस्थानला भरघोस दान