राहुल गांधी यांनी सांगितले कोरोनाविरोधात लढण्याचे उपाय

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढायचे असेल तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णांपेक्षा अधिक गतीने टेस्टिंग किट वाढवाव्याच लागतील. केवळ टेस्टिंग किट नव्हे, तर चाचण्यांचे प्रमाण सुद्धा स्थानिक पातळीपर्यंत वाढवावे लागेल. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस आहे आणि ज्या ठिकाणी कोरोना व्हायरस नाही त्या सर्व परिसरात लक्ष द्यावे लागले. ___ कोरोना व्हायरस संदर्भात सुरू असलेल्या लॉकडाउन संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. तसेच सरकारच्या लॉकडाउन धोरणावर टीका केली. कोरोना व्हायरस थांबवण्यासाठी लॉकडाउन जारी केला आहे. त्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात आली. परंतु, लॉकडाउनमुळे कोरोना थांबणार नाही. लॉकडाउन हे केवळ एका पॉज बटण सारखे आहे. लॉकडाउन उघडताच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते. व्हायरस आपले काम पुन्हा सुरू करेल असे राहुल गांधी म्हणाले आहेत. नरेंद्र मोदींशी अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण यावेळी व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ असे राहुल गांधी म्हणाले आहेत. भारतात कोरोनाच्या परिस्थितीने गंभीर पल्ला गाठला आहे. अशात सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या विरोधात लढा द्यायला हवा. या कठिण परिस्थितीत सरकार आणि प्रशासनासह सर्वांनी एका स्ट्रटेजीप्रमाणे काम करायला हवे. लॉकडाउनमुळे अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे समस्या केवळ पुढे ढकलली गेली असेही राहल यांनी सांगितले.