पुणे : करोना विषाणने संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला असला तरी करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येवले अमृततुल्य यांच्या कडून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, गणेश येवले, निलेश येवले, मंगेश येव तसेच संजय येवले निलेश मोरे उपस्थित होते. तसेच येवले फांऊडेशनच्या वतीने पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी व भिवरी या संपूर्ण गावकरी, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना मास्क तसेच सॅनिटायझरचे मोफत वाटप केले गेले. तसेच संपुर्ण गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे.
'येवले अमृततुल्य'तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत...