नवी दिल्ली : डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यांच्या वाहनाचे नुकसान केले तर संबंधित हल्लेखोरांकडून दुप्पट पैसा वसूल केला जाईल. त्याचबरोबर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यावरील हल्ला करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार लवकरच कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या नव्या अध्यादेशामुळे हल्लेखोरांना जामीन मिळणार नाही. तसेच या प्रकरणाचा तपास ३० दिवसांमध्ये पूर्ण केला जाईल. अशा घटनांमधील दोषींना ३ महिने ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होईल. तसेच ५० हजार ते २ लाखांपर्यंत दंडही आकारला जाणार असल्याचे मंत्री जावडेकर यांनी सांगितले.
डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा तसेच ३ महिने ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा