नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. परिणामी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. या सर्वांना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठा दिलासा दिला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना शून्य रुपयाचे वीजबिल देण्यात येणार आहे. लॉकडाऊनंतर वास्तविक बिल आकारण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे दिली.
व्यावसायिकांना दिलासा वीजबिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित