दिलासादायक! जगातील एका दिवसातील मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट

जगात एका दिवसातील नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत तसेच मृतांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येत आहे. जगात काल ४ हजार ९६२ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ती शनिवारच्या तुलनेत २३.७२ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या चौदा दिवसांतील हा मृतांचा सर्वात कमी आकडा आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या नोंदीतही शनिवारच्या तुलनेत काल ८.५ टक्क्यांची घट दिसून येत आहे. काल एकूण ७५ हजार नवीन रुग्ण सापडले. ही संख्या देखील गेल्या पाच दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. कोरोनाच्या प्रसाराचा वाढता वेग पाहून धास्तावलेल्या जगासाठी या दोन्ही गोष्टी खूपच आशादायक मानल्या जात आहेत. दरम्यान, अमेरिकेने काल कोरोना बळींचा ४० हजारांचा टप्पा ओलांडला.