पुणे : पुण्यातील एका कचरा वेचणाऱ्या महिलेने १५ हजार रुपयांची मदत केली आहे. गवळणबाई मुरलीधर उजगरे या गेल्या २० वर्षांपासून कचरा गोळा करतात. यावरच त्यांचा चरितार्थ चालतो. माहिन्याला अवघे पाच ते सहा हजार रुपये मिळतात. पण तरीही गवळणबाईंच्या मनाच्या श्रीमंतीची तुलना कशासोबतच होऊ शकणार नाही. आतापर्यंत साठवलेले सगळे पैसे त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी देऊन टाकले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री फंड आणि दोन सेवाभावी संस्थांना एकूण १५ हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे. गवळणबाई उदगरे पुण्यातील धानोरी भागातील भीमनगरमधल्या झोपडपट्टीत राहतात. अशा परिस्थीतीमध्येही त्यांचं धैर्य आणि इच्छाशक्ती कमी झालेली नाही. कोरोनोवर मात करण्यासाठी सध्या अशाच शूरवीरांची गरज आहे.
कचरा वेचणाऱ्या महिलेचे औदार्य ! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी १५ हजारांची मदत