'चला हवा येऊ द्या' मधील लोकप्रिय विनोदवीर कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. त्याने त्याच्या कुटुंबाबरोबर सादर केलेले ‘गो करोनिया' हे गाणे सध्या व्हायरल झालं. या गाण्याबरोबरच आणखी एक भारुडही कुशलने, पत्नी आणि मुलांबरोबर सादर केलं. घरातल्या घरात आपल्या आवडत्या कलाकाराने सादर के लेले हे प्रयोग लोकांच्या भलतेच पसंतीस उतरले आहेत. लोकांच्या मनोरंजनासोबतच सध्याच्या परिस्थितीत लोकांनी काय काळजी घ्यायला हवी, सरकार-प्रशासनातर्फे सुरू असलेले प्रयत्न आणि त्याला नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी कशाप्रकारे साथ दिली पाहिजे, यावर प्रबोधन करण्याचा कुशलचा उद्देश प्रामुख्याने दिसून येतो. नुकतंच कुशलने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये त्याने पोलिसांचा गणवेश परिधान केला असून त्याच्या हातामध्ये एका कार्डबोर्डवर थेंक यु लिहिलेलं आहे. कुशल सोशल मिडीयाच्या माध्यमाने पोलिसांचे मनापासून आभार मानतोय. कठीण परिस्थितीत स्वतःचा विचार न करता पोलीस रात्र काम करून आपली सेवा करतात आहेत. त्यामळे त्यांचे आभार मानण्यासाठी कशलने हा फोटो पोस्ट केला आहे.
कुशलने मानले पोलिसांचे आभार
• Vidya S. Joshi