पुणे : पुणे शहर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनात शहरातील पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचा अपयशाचा निषेध केला. __ आज सकाळी शहराच्या विविध भागांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या अंगणात शासनाच्या निष्कियतेच्या घोषणा असणारे फलक प्रदर्शित करून जनतेचे आणि सरकारचे लक्ष वेधले. यावेळी सामाजिक अंतर कटाक्षाने पाळण्यात आले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी आपआपल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
महाराष्ट्र बचाओ आंदोलनात पुण्यात पाच हजारांहून अधिक भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग