पुणे : पुणे शहर टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत आहे. पुणे हे रेड झोनमध्ये येत असल्याने त्यातील काही भागच सुरू करण्यात येणार आहे. संक्रमणशील भागात (उदा. : भवानी पेठ) फक्त सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत दुध, भाजीपाला व इतर किरकोळ विक्री जिवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू राहणार असून हॉस्पीटल, प्रसुतीगृह सुरू राहतील. ओरेंज झोनमध्ये सोमवार, बुधवार, शुक्रवारी अत्यावश्यक सेवा ७ ते ७ (१२ तास) सुरू राहणार असून यामध्ये दुध, भाजीपाला, फळ, किरणा, चिकन, मटन, अंडी विक्री, रूग्णालये, क्लीनीक औषधे दुकाने सुरू राहणार आहेत. तर सोमवार, बुधवार, शुक्रवारी इलेक्ट्रॉनिक, मोबाईल विक्री दुरूस्ती, कॉम्प्युटर, भांड्यांची दुकाने सुरू राहणार आहेत. वमंगळवार, गुरूवार, शनिवार, रविवार वाहन दुरूस्ती, हॉर्डवेअर, प्लंबिंग, कपडे, डेअरी उत्पादने, बांधकाम विक्री साहित्य सुरू राहणार आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची विक्री करता येणार आहे. याबरोबरच लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, टिळक रोड, अप्पा बळवंत चौक परिसर, कुमठेकर रोड, एमजी. रोड, कोंढवा रोड, हॉटेल ज्योती ते एनआयबीएम रोड अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने बंद राहणार आहते. पेट्रोल पंप सुरू असणार आहे.
वारानुसार सुरू राहणार दुकाने