लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीलाही परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आता लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात तंबाखूच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. यानंतर मद्यविक्रीच्या वेळी असेलेल्या रांगांसारखंच चित्र तंबाखू विक्रीच्या दुकानांसमोरही पाहायला मिळालं. सूरतमधील तंबाखू विक्री करणाऱ्या दुकानांसमोर बुधवारी मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. या ठिकाणीही लोक तासनतास उभे असल्याचंही दिसून आलं. __करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे मला आणि माझ्या वडिलांना तंबाख मिळाली नाही. परंतु दुकानं सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा मी जिवंत झालो असं वाटत आहे. एका तासापेक्षा अधिक वेळ मी या रांगेत उभा होतो, अशी प्रतिक्रिया तंबाखू घेण्यासाठी आलेल्या एकानं बोलताना दिली.
आता तंबाखूसाठी लांबच लांब रांगा