तळीरामांनो गर्दी करू नका ; आता टोकन पद्धत गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून नवी नियमावली

महसूलाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेली मद्य विक्रीची दुकानं सुरू झाल्यानंतर नागरिकांनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्याचे चित्र सगळीकडेच दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी एक नवी नियमावली राज्य सरकार राबविणार असून त्यानुसार आता तुम्हाला टोकन मिळणार आहे. रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म द्यावा. ग्राहकांना हा फॉर्म दिल्यानंतर टोकन क्रमांक देण्यात यावा. टोकन उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर दुकानाचा शिक्का आणि मोबाईल नंबर देऊन टोकन क्रमांक लिहावा. अशा पद्धतीनं एका तासात ५० ग्राहकांना सेवा देता येईल. त्यानंतर दुसऱ्या तासात ५१ ते १०० असे क्रमांक घेण्यात यावे. अशा प्रकारे ८ तासात ४०० लोकांना मद्य विक्री केली जाऊ शकते. उर्वरित लोकांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगावं. यामुळे गर्दी नियंत्रित करता येईल. हे सर्व करताना सोशल डिस्टसिंगच्या नियमाचं काटेकोटरपणे पालन करण्यात यावं. यासाठी मद्य विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. त्याचबरोबर राज्याच्या प्रत्येक विभागातील जवान, सहायक दुय्यम निरीक्षकांनी सोशल डिस्टसिंग आणि गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी, असं विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आलं आहे.