*बीएसएनएलची भन्नाट ऑफर, ४ महिन्यांपर्यंत इंटरनेट सेवा फ्री *

बीएसएनएलच्या ब्रॉडबँड युजर्सना ४ महिन्यांपर्यंत फ्री सर्विस ऑफर केली आहे. या जबरदस्त ऑफरचा फायदा भारत फायबर ब्रॉडबँड युजर्ससोबत लँडलाईन ब्रॉडबँड आणि Wi-Fi Max ब्रॉडबँड युजर्संना दिला जात आहे. देशातील खासगी कंपनीला टक्कर देण्यासाठी सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलने नवीननवीन प्लान आणायला सुरुवात केली आहे. बीएसएनएलच्या ब्रॉडबँड युजर्सना ४ महिन्यांपर्यंत फ्री सर्विस ऑफर केली आहे. या ऑफर अंतर्गत सर्व जण याचा फायदा घेऊ शकतात जे बीएसएनएलच्या ३६ महिने चालणाऱ्या कोणत्याही प्लानला सब्सक्रायबर्स करतील. कंपनीकडे अन्य लाँग टर्मचे प्लास सुद्धा आहेत. यात चार महिन्यांपर्यंत फ्री सर्विसची ऑफर दिली जात नाही. जाणून घ्या या ऑफर संदर्भात... बीएसएनएलच्या भारत ब्रॉडबँड आणि अन्य ब्रॉडबँड कनेक्शन सोबत एकाहून अधिक जास्त लाँग टर्म प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये दुसऱ्या अनेक बेनिफिट मिळत आहेत. १२ महिन्याच्या या प्लानमध्ये कंपनी एक महिन्याची फ्री सर्विस आणि २४ महिन्याच्या प्लानमध्ये ३ महिन्याची फ्री सर्विस देत आहे. जर तुम्ही ३६ महिन्याचा प्लान घेतला तर तुम्हाला एकूण ४० महिन्याची सर्विस फ्री मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला चार महिने फ्री इंटरनेट सर्विस मिळू शकणार आहे.