सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार : नितीन गडकरी

नवी दिल्लीः सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे. पण कडक नियमांसह ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. लॉकडाऊनमुळे देशातील अनेक भागांमध्ये नागरिक अडकून पडले आहे. या नागरिकांना आपल्या घरी जाण्यासाठी विमान, रेल्वे आणि बस वाहतूक लवकरच सुरू केली जाईल, असं गडकरी म्हणाले. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचे लवकरच नियोजन केले जाईल. खासकरून बससेवा आणि कॅब सेवा सुरू करण्यावर लक्ष आहे. पण यासाठी काही नियम घालण्यात येतील, असं गडकरींनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी यांनी बस आणि कार ऑपरेटर संघटनेच्या सदस्यांशी आज चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.