त्या ऐतिहासिक सामन्यात सचिन बाद होता – डेल स्टेन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या त्या खेळीबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सचिनने ग्वालियर येथे झालेल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावा केल्या होत्या. या सामन्यात सचिन बाद असताना अंपायरने त्याला बाद दिले नव्हते, अशी माहिती जलद गोलंदाज डेल स्टेनने दिली. सचिनने आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक अशी खेळी करत नाबाद २०० धावा केल्या होत्या. अशी खेळी करणारा तो पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला होता. या सामन्यात सचिन १९० धावांवर खेळत असताना बाद झाला होता. पण अंपायर इयान गूल्ड यांनी त्याला बाद दिले नाही. असे स्टेन म्हणाला. सचिन द्विशतकापासून १० धावा दूर होता आणि माझ्या चेंडूवर तो ङइथ झाला. पण अंपायरनी त्याला बाद दिले नाही. यासंदर्भात मी त्यांना मैदानातच विचारणा केली असता ते म्हणाले, मित्रा आजूबाजूला बघ त्याला (सचिन) बाद दिले. तर मी हॉटेलमध्ये जाऊ शकणार नाही.