सध्या कोरोनाचा सामना करण्यापेक्षा विरोधकांचे सरकार पाडण्याकडे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर नारायण राणे यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली तर दुसरीकडे आज संध्याकाळी ४ वाजता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. संपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली. त्यामुळेच राजकीय चर्चांना सोमवार संध्याकाळपासूनच उधाण आलं आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागणार का यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.
आज माजी मुख्यमंत्री काय बोलणार ?