स्थानिक कामगारांबरोबरच उद्योजकांनाही नवीन संधी
लॉकडाऊनमुळे देशभर उद्योग क्षेत्र अडचणीत असले तरी संकट दर झाल्यानंतर भारतातील उद्योजकांना व औरंगाबादच्या स्थानिक कामगारांना चांगले दिवस येतील. मॉड्युलर फर्निचर, टॉईज, फूड प्रोसेसिंग युनिट, रेडी टु इट फुड इंडस्ट्री, शेतीसाठी लागणारे रसायने, मॅन मेड फायबर, एअर कंडिशनर, कॅपिटल गूड, औषध निर्मितीसाठी लागणारे यंत्र, चामड्याच्या कारखान्यात लागणारी रसायने, ॲटो कंपोनंट या क्षेत्रात उद्योजकाना नवीन संधी मिळतील. हे कारखाने औरंगाबाद ऑरिक सिटीत येण्यास संधी आहे. उद्योग क्षेत्रात अधिकाऱ्यांबरोच कुशल व अकुशल हे दोन्ही कामगार लागणार आहेत. अगदी सातवी पास तरुणालादेखील नोकरीची संधी मिळू शकते. त्यांना ५ हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. ___ काही उद्योजकांच्या मते, ज्याप्रमाणे परप्रांतीय कामगार अंग झोकून काम करतो त्याचप्रमाणे स्थानिक कामगारांनीदेखील काम करायला हवे. मेहनत, काम करण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा या गोष्टी उद्योग क्षेत्रात महत्त्वाच्या आहेत. वाळूज परिसरात सध्यादेखील स्थानिक कामगारांची भरती सुरू आहे. आयटीआयच्या वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशन हा ट्रेड शिकलेल्या तरुणांना औरंगाबादेतील एमआयडीसीत चांगली मागणी आहे.