मुंबई : कोरोनामुळे देश लॉक डाऊन करण्यात आला आणि त्यामुळे दहावी आणि बारावीचे शेवटचे पेपर रद्द करण्याची वेळ आली होती. मात्र आता शिक्षकांचं पेपर तपासण्याचं काम सुरु झालंय अशी माहिती बोर्डाकडून मिळाली आहे. कोरोनामुळे पेपर तपासण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जुनच्या दुसऱ्या आठवड्यात लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ___ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार नूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होऊन निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहावी आणि बारावीचे निकाल १० जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी हा निकाल maharesults.nic.in या वेबसाईटवर पाह शकणार आहेत.
दहावी आणि बारावीचे निकाल १० जूनपर्यंत येण्याची शक्यता