पुणे : कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी मोफत मास्क व रेशन वितरित केले जाणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली. नागरिकांना देण्यात येणाऱ्या रेशन किटमध्ये जीवनावश्यक वस्तू अर्थात साखर, पीठ, गोडेतेल, तूरडाळ, तांदूळ, पोहे, मीठ, साबण, मिरची पावडर, चहापावडर व दुधपावडर या जीवनावश्यक वस्तूंचा रेशन किट मध्ये समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या रेशन किटची थैली परिसरातील संबंधित लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्या उपस्थितीत वितरण केले जाणार आहे. सुमारे ७० हजार घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात येणार असल्याचे महापौर मोहोळ आणि आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.
प्रतिबंधित क्षेत्रात मास्क व रेशनचे महापालिकेच्या वतीने मोफत वाटप