फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा, भाजपाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषेत ट्रोल केलं जात असून ट्रोल करणाऱ्यांना रोखलं जावं अशी मागणी भाजपा नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे. ज्या पद्धतीने सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे, तसंच अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.