पुणे, पिंपरी चिंचवडमधून बाहेर जायचे आहे ? या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर घ्या !

पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये अधिकाऱ्यांची पुढील आदेशापर्यंत निश्चित नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( मो. क्र. ९४२३०४३०३०) यांच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडून यादी प्राप्त करून घेणे, तसेच संबंधित कामगारांचे स्क्रिनिंग झाल्याबाबतची खात्री करणे. तसेच त्या संबंधित राज्याकडून परवानगी घेणे, परवानगी पत्र तयार करून घेणे व त्यांना संबंधित राज्यामध्ये पाठविण्यासाठी बस, रेल्वे या बाबतची व्यवस्था करणे आदी जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. तीन श्रीमंत पाटोळे (मो.क्र. ९०७५७४८३६१) यांच्याकडे पुणे महापालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या-त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे. ___ उपजिल्हाधिकारी, नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय, पुणे हिंमत खराडे ( मो.क्र. ९४२२०७२५७२) यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या-त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामकाज करणे. ___ उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. १७ आरती भोसले (मो.क्र. ९८२२३३२२९८) यांच्याकडे ग्रामीण हद्दीतून बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करणे व संबंधित कामगारांना त्या-त्या राज्यामध्ये पाठविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय ठेऊन कामकाज करणे, तर सर्व उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्थलांतरित कामगारांना पुणे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांची यादी तयार करून संबंधित जिल्ह्याकडून परवानगी प्राप्त करून घेऊन संबंधितांना त्या-त्या जिल्ह्यामध्ये पाठविणे कामी बसची व्यवस्था करणे, तसेच पुणे जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यामध्ये जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांची यादी संबंधित नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.