लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू आपल्या घरीच होते. पण आता मात्र असे होताना दिसणार नाही. कारण चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. __चौथ्या लॉकडाऊनमध्ये स्टेडियम खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्पर्धा भरवता येऊ शकतात. त्यामुळेच चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी असेल. स्टेडिमबरोबरच क्रीडा संकुलेही आता खुली करण्यात येणार आहेत, जेणेकरून खेळाडूंना सराव करता येईल आणि तंदुरुस्त राहता येईल. पण हे दोन महत्वाचे निर्णय झाले असले तरी एक मोठा निर्णय मात्र अजून होऊ शकलेला नाही.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रिडा संकुले होणार खुली