विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत पुणे जिल्ह्यात कामगार व नागरिकांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्याकरिता आवश्यक असणाऱ्या परवानग्या व वाहनाची व्यवस्था तसेच त्यांची तपासणी करणे, प्रवासादरम्यान जेवणाची व्यवस्था याबाबत चर्चा झाली. पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांना स्पष्ट माहिती मिळण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्यासमवेत रोज पुणे शहर हद्दीत आयुक्त पुणे महानगरपालिका, पोलीस आयुक्त पुणे शहर तसेच ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी पत्रकार परिषद घ्यावी. पुणे शहर व जिल्ह्यामध्ये रेशनिंग दुकानाद्वारे नागरिकांना धान्य पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात. तसेच पेट्रोल पंप व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून पेट्रोल पंप चालकांनी सेवा द्यावी. पुणे व्यापारी असोसिएशनचे फत्तेचंद रांका व पेठेचे श्री सूर्यकांत पाठक यांच्या विनंतीवरून शहरातील सर्व प्रकारची दुकाने चालू करावी व सध्या उन्हाळा सुरू असल्याने सकाळी ३ तास व सायंकाळी ३ तास दुकाने सुरू ठेवणेबाबत सूचना केली. तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत बैठक घेऊन कंटेनमेंट भागात जास्तीच्या २० रुग्णवाहिका व डॉक्टर सेवा पुरविण्याबाबत आम्ही आश्वासन दिले. कोविंड शिवाय इतर आजारांच्या रुग्णांकरिता शहरात चोपन्न ठिकाणी आरोग्यसेवा सुरू असल्याबाबत आयुक्तांनी सांगितले. कंटेनमेंट झोन मधल्या संशयित रुग्णांची तपासणी अधिक संख्येने करावी, शहरातील पाणी पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याबाबत व कचरा संकलन व्यवस्थित होणेबाबत सूचना केली. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, राजेशजी पांडे, समीर लडकत अध्यक्ष पुणे पेट्रोल-डिझेल असोसिएशन, श्री.सागर रुकारी उपाध्यक्ष पुणे पेट्रोल-डिझेल असोसिएशन उपस्थित होते.
गिरीश बापट यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा