....आता ही गावे राहणार आठ दिवस बंद

बीड: करोनाची लागण झालेल्या एका रुग्णाचा बीड शहरासह विविध गावांतील अनेकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क झाल्याचं आढळून आल्यानं बीड जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं बीडसह काही गावे कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून पुढील आठ दिवस पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसे आदेश दिले आहेत. पाटोदा तालुक्यातील कारेगावचा एक रुग्ण करोनाची लागण झालेला आढळलेला आहे. त्याचा बीड शहरातील व आसपासच्या काही गावांतील अनेकांनी संपर्क आल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तसा अहवालही सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर इतर ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण बीड शहरात व बीड तालुक्यातील खंडाळा, चव्हाटा, पालवण व इट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही व धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा व धारुर तालुक्यातील पारगांव या गांवामध्ये आठ दिवसांसाठी संचारबंदी राहणार आहे.