मटका किंग रतन खत्री यांचं निधन

मुंबई : मटका किंग रतन खत्री यांचं निधन झालं आहे. मुंबईत शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रतन खत्री मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. शनिवारी सकाळी खत्री यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सट्टा आणि मटका क्षेत्रातल्या लोकांना दुःख अनावर झालं आहे.