मार्केटयार्डात जायचंय मग हे वाचा !

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ भुसार बाजार विविध उपायोजनांसह आठ दिवसानंतर पुन्हा सुरू झाला आहे. बाजारातील पंधरा व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुसार बाजार बंद ठेवण्यात आला होता. बाजार समितीच्या नियोजनामुळे सोमवार (ता. २५) पासून गूळ भुसार बाजार नियमित सुरू झाला आहे. भुसार मालाची दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत उघडी राहणार आहेत तर सुकामेवा व पुरक दुकाने सकाळी १० ते दुपारी ३ उघडी राहणार आहेत. व्यापारी, हमाल, खरेदीदारांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून बाजारात येणाऱ्या ग्राहकांत ३ ते ४ फुटांचे अंतर ठेवणे तसेच सॅनिटाटझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सायंकाळी ६ नंतर बाजारात थांबण्यास बंदी होणार असून सर्वांना गेट क्रमांक पाचमधून वाहनांना प्रवेश देण्यात येईल.