नवी दिल्ली – देशातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी ओळखावी असंही मोदी म्हणाले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात विविध उपाय केले जात आहेत. सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, टेस्टच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदी सरकार कशापद्धतीने काम करत आहे. याबाबत अनेक एजन्सी सर्व्ह करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कोरोना सक्षमपणे लढण्यास समर्थ असल्याची माहिती एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे. शहरी भागातील ८७ टक्के भारतीय मोदी सरकारच्या कोरोनासंदर्भातील कामावर समाधानी असल्याचं म्हणत आहेत. इप्सॉस या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणामधून ही आकडेवारी समोर आली आहे. यानुसार, शहरी भागातील ८७ टक्के लोकांनी कोरानाशी सामना करणाऱ्या मोदी सरकारला हाय रेटींग दिलं आहे. कंपनीने २३ ते २६ एप्रिलदरम्यान जगभरातील १३ देशांमध्ये २६ हजार लोकांची याबाबत मते जाणून घेतली.
कोरोनाच्या लढाईत मोदी सरकारचे काम नंबर १