शिव-शंभूप्रेमींनी आपल्या कल्पनेतील डूडल तयार करून DoodleofSambhajiRaje या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मोहीमही लवकरच सुरू करणार असल्याचे समजते. दरम्यान आपल्या कारकिर्दीत एकही लढाई न हरलेला योद्धा म्हणून संभाजी राजांना ओळखले जाते. या कार्याचा गौरव म्हणून यंदा छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे छायाचित्र असलेले डूडल प्रदर्शित करण्याची मागणी गूगलला करण्यात येत आहे. ट्रिटरवरील मोहिमेसोबतच गुगलच्या proposalsgoogle.com या अधिकृत ई-मेलवर मेल पाठवून संभाजी महाराजांच्या डूडलची मागणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे डूडलच्या मागणीसाठी - नेटकऱ्यांची मोहीम !