नमस्कार, गुड मॉर्निंग,
आपण सध्या एका कठिण काळातून जात आहोत. एका गंभीर आजाराचा आपण सर्वजण सामना करत आहोत. परंतु घाबरू नका कारण बरे होणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार भारतात व्हेंटीलेटर लागणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि हो महत्त्वाचे म्हणजे नव्वदी पार केलेले आजी, आजोबांनीही या आजाराला धूळ चारली आहे, तेंव्हा लक्षात ठेवा घाबरू नका फक्त काळजी घ्या.
वृत्तवाहिन्यांचं वाईट रिपोर्टिंग बघू नका. इथे १२ रूग्ण सापडले अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका. कारण ते ना दहशतवादी आहेत, ना कुणाचा जीव घ्यायला आलेत. ते आजारी पडलेत.
सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करा.
सॅनिटायझरचा वापर करा तसेच सतत साबणानं हात धुवत राहा
गरज नसताना गीत जाऊ नका. मास्कचा वापर करा. आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील लहान मुले, वृद्ध यांची विशेष काळजी घ्या.
वरील गोष्टींचे पालन केले तर हा गंभीर आजार होऊच शकत नाही. इतकं करूनही संसर्ग झालाच तर घाबरू नका आणि कृपया ज्यांना संसर्ग झालाय त्यांना वाळीत टाकण्याचे प्रकार करू नका.
लक्षणांकडे लवकर लक्ष दिल्यास आणि योग्य काळजी घेतलीत तर आठ दिवसात अगदी ठणठणीत व्हाल. हा संसर्ग कुणालाही होऊ शकतो. त्यातून बहुतांश लोकांना बरं वाटले आहे.