मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या नियमाच्या उल्लंघनाचे ८९ हजार ३८३ गुन्हे राज्यात दाखल झाले आहेत. या प्रकरणांत एकूण १७ हजार ८१३ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक १४ हजार २२० गुन्हे पुण्यात दाखल करण्यात आले. मुंबई पोलिसांनी १० हजार ४९० गुन्हे नोंदवले. ठाण्यात १६२५ आणि नवी मुंबईत ५३७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. रायगडमध्ये ४०२, तर पालघरमध्ये ९९० गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ७११ गुन्हे दाखल केले. वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल ३ कोटी १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यभरात पोलिस विभागाच्या १०० या क्रमांकावर ८२ हजार १२८ दूरध्वनी आले. पोलिसांनी हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का असलेल्या ६२८ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात पाठवले. अवैध वाहतूक करणाऱ्या १२४२ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांविरोधात व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
८९ हजार ३८३ नियम उल्लंघनाचे गुन्हे दाखल