मुंबई : लॉकडाउन नंतर काय होणार हा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. एमबीएच्या तीन पदव्या, इंपोर्ट- एक्सपोर्टची पदवी तसेच पीएचडी केलेल्या ओंकार माळी यांनी शेतकरी, तरुण व महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून हा ऑनलाइन उपक्रम असणार आहे. ३६ तासांच्या या ऑनलाइन उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ओंकार माळी यांनी केले आहे. रोज दोन तास प्रशिक्षण कालावधी असेल. मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे यासाठी विशेष सहकार्य असणार आहे. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर ९३३३५७९३३३ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
लॉकडाऊन नंतर काय ? मनसेचा महाराष्ट्र दिनी अभिनव संकल्प ! तरुणांना इंपोर्ट - एक्सपोर्ट व डिजिटल मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण!