- पुनीत बालन ग्रुप चे सहकार्य
पुणे : कोरोनाशी सामना करतानाच शहरातील नागरिकांना वैद्यकीय मदत लागली तर, त्यासाठी रिक्षा उपलब्ध करून देणाऱ्या २०० चालकांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आणि उद्योगपती पुनीत बालन यांच्या सहकार्याने प्रत्येकी सुमारे दिड लाख रुपयांचा आरोग्य विमा उपलब्ध झाला आहे. शहरात आपत्कालीन वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी ९८५९१ ९८५९१ या मोबाईल दूरध्वनी क्रमांकाद्वारे २५ मार्चपासून रिक्षा सेवा सुरू झाली आहे. त्यातील २०० रिक्षा वाहतूक करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून हे रिक्षाचालक सेवा पुरवितात. मात्र, त्यांना कोरोना किंवा अन्य कोणताही आजार झाल्यास कोणतेही विमा संरक्षण नव्हते. ही बाब समजल्यावर महापौर मोहोळ यांनी पुढाकार घेतला आणि बालन यांच्या सहकार्याने या रिक्षाचालकांना विमा काढून दिला. नितीन पवार, बापू भावे, राहल शितोळे, वाहतूक शाखेतील सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या उपस्थितीत महापौर मोहोळ आणि बालन यांच्या हस्ते विमा पॉलिसीचे इश्वर मंजरीकर, शैलेंद्र गाडे, इम्तियाज सय्यद, महेश पडवळ आणि छाया ओहाळ या रिक्षाचालकांना प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.