पुणे : लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अखेर घरी जाण्यासाठी थेट जिल्हा प्रशासनानेच मदत करण्याचा निर्णय घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत खासगी बसने त्यांच्या जिल्ह्यात सोडले जाणार आहे. यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेचे सहकार्य घेतले जात आहे. __ गेल्या ५४ दिवसांपासून पुण्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी एकट्याने खोलीत रहात आहेत. त्यांना गावाकडे जायची परवानगी मिळावी, सरकारने बसची सुविधा करावी अशी मागणी विद्यार्थी करत होते. सरकार 'दिल्लीतील विद्यार्थी महाराष्ट्रात आणत आहे, पण पुण्यातील मुलांसाठी काहीच होत नाही यावर संताप व्यक्त करत होते. या विद्यार्थ्यांना मदत म्हणून काही विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी मोफत बस उपलब्ध करून दिली. पण सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. _ विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नैसर्गिक आपत्ती निधीतून या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना घरी जाता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यासाठी बसची सोय केली जाईल. यासाठी जिल्हा प्रशासनास मदत करणार आहोत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ९१५८२७८४८४, ८४८४०८६०६१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोफत घरी सोडणार