नोकरीतून कमी केले म्हणून त्याने काय केले

शिकागो : आपल्या चालकाला नोकरीतून कमी करणं एका मालकाला चांगलंच महागात पडलं आहे. कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने आपल्या मालकाच्या पाच कोटींच्या कारचा चुराडा केला. ही धक्कादायक आणि अजब घटना शिकागोमध्ये घडली. __ या चालकाच्या नोकरीबाबत त्याचे वरिष्ठ संतुष्ट नव्हते. त्यांनी दिलेल्या सूचनांनतरही कामाबाबत त्याची कामगिरी फारशी महत्त्वाची नव्हती. त्यामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आले. पूर्ण भरपाई व वेतन देऊन त्याला नोकरीवरून काढले. नोकरीवरून न काढण्याची विनवणी त्याने केली. मात्र, कंपनी निर्णयावर ठाम राहिली. अखेर कंपनी सोडण्यापूर्वी त्याने फेराणी ही कार तुमची आहे का ? अशी विचारणा मालकाला केली. त्याने होकारार्थी उत्तर दिल्यानंतर परिणाम वाईट होणार असल्याची धमकी चालकाने दिली. ___ अखेर काही वेळेनंतर संतापात असलेला चालक ट्रक घेऊन आला. कार्यालयीन परिसरात असलेल्या कारवर त्याने ट्रक चालवण्यास सुरुवात केली. मालकाने त्याला थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर त्या चालकाने मालकाच्या पाच कोटींच्या फेरारीवर टक चढवला आणि चुराडा केला. या घटनेनंतर मालकाच्या तक्रारीवरून चालकाला अटक करण्यात आली आहे.