सध्या कोरोना व्हायरसमुळे देशात तिसरा लॉकडाउन घेण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेकजण अडकून पडले आहेत. राजकारणीही त्यातून सुटले नाहीत. परंतु या सर्वाची उत्तमप्रकारे दखल घेतली ती खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. लॉकडाऊनच्या वेळेस जनतेला उद्देशून त्यांचे भाषण आठवून पहा. यामध्ये त्यांनी आपल्या भाषणातच काय कंटाळलात ना ? असे उदगार काढले होते. परंतु याबरोबरच हे लॉकडाऊन का गरजेचे आहे. याचे समर्पक उत्तरही त्यांनी दिले होते. त्यांना कोरोनारूपी राक्षसाचा वधही करायचा होता व नागरिकांचे प्राणही त्यांच्यासाठी मोलाचे होते ? त्यामुळे नागरिकांना वारंवार घरी राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते. त्यांच्या प्रत्येक वेळेच्या संवादात दिसून येत होती ती नागरिकांसाठी आपुलकी व नम्रपणा. हे काही ठरवून होत नाही... तर त्यासाठी लागतो जिव्हाळा आणि सर्वासामान्यांबद्दल आपुलकी. याचीच जाणीव पदोपदी आपल्याला होत होती. ___ याबरोबरच पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीय नागरिकांची काळजीही ते स्वत: घेताना दिसलेत. बिहारच्या आमदारांनी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचा ऑडीयो मॅसेजही व्हायरल होत आहे. यावेळी त्यांच्या बोलण्यातला सौम्यपणा दिसतो. हां उद्धव बोलतोय !' हे बरेच काही सांगून जाणारे आहे. आमदारांनी बिहारी नागरिकांची अडचण सांगितल्याबरोबरच पेन घेऊन त्यांचे फोन नंबर घेणारे आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होते. फक्त नंबर घेऊन न थांबता सत्वर कारवाई सुद्धा त्यांनी केली. दुसरे उदाहरण म्हणजे , ठाणे जिल्ह्यातील मध्यमवर्गीय लोटन सोनार यांचा मुलगा चेन्नईला लॉकडाऊनमध्ये अडकून राहिला. त्याला राहण्यापासून खाण्यापर्यंत अनेक अडचणी सुरू झाल्या. अखेरीस लोटन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ संबंधित मंत्र्यांच्या साह्याने मुलाला मदत पोहचवून राहण्याची व्यवस्था केली. फक्त एका पत्रावर मुलाला मदत मिळाल्याने बापाने गहिवरून मुख्यमंत्रांना पुन्हा एक पत्र पाठवले. यामध्ये त्यांनी मनोभावाने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद म्हटले आणि असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, अशी भावना व्यक्त केली. या ईमेलमध्ये लोटन म्हणाले की, आसा मोहरा झाला नाही कधीही न होणार, उद्धवजी हे नाव जगात गर्जत राहणार. कोटी कोटी धन्यवाद.
कसे आहेत आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे