कोरोनाचे संकट २१ मे पासून हळूहळू कमी होणार : स्वामी विजयकुमार

 पुणे : मंगळाची मकर राशीत शनि आणि फ्लूटो सोबत झालेली युती जगावर कोरोनाचे गूढ संकट घेऊन आली. ही परिस्थिती २१ मे पासून हळूहळू कमी होईल त्यामुळे ग्रहस्थिती बदलेपर्यंत प्रत्येकाने नियमांचे पालन करुनच काम करायला हवे. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, स्वच्छतेची काळजी ही पथ्ये पाळली तर संकटाच्या या काळातून सुरक्षितपणे बाहेर पडणे शक्य होईल, असेही विजयकुमार स्वामी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारत लवकरच या संकटावर मात करेल. देशात मे महिन्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसेल. २० मे रोजी राहू अद्रा या नक्षत्रातून मृग नक्षत्रात जात असल्याने पृथ्वीवरील नकारात्मक लुप्त विषाणूची शक्ती कमी होईल. मकर ही रास पृथ्वीतत्वाची असून, शनी पृथ्वी आणि वायूतत्वाचा मारक असल्याने एकूण हवाच प्रदूषित झाल्याचे दिसते. २९ जूनला गुरुमहाराज धनु राशीत येणार असल्याने संकटाचे मळभ दूर होईल, अशी ग्रहस्थिती दर्शवते.