कल्याण- लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेले परप्रांतीय मजूर लाखोच्या संख्येने आपल्या गावी परतण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात परप्रांतीयांचा भरणा झाल्याने राज्यातील मराठी माणसाला रोजगार मिळत नाही. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय गावी जात असल्यने लॉकडाऊनने मराठी माणसाला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. मराठी तरुणांकडून विविध कामांसाठी अर्ज मागविण्यास मनसेच्या कामगार सेनेकडून आवाहन करण्यात आले आहे. परप्रांतीयांचे लोंढे रोखा असे मनसेच्या स्थापनेपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे सांगत होते. त्याचा फायदा घेत मनसे त्यांच्या अजेंडावरील कळीचा मुद्दा राबविण्यास सुरुवात केली आहे. ड्रायव्हर, पेंटर, कार मेकॅनिक, प्लंबर, सीसीटीव्ही कॅमेरा असेंबल्ड, सुरक्षा कर्मचारी, हाऊस किपिंग, कॉम्प्युटर सर्व्हिस, केअर टेकर, नर्सेस, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, ट्रान्सपोर्ट, वॉटर सप्लायर्स यामध्ये आता मराठी तरूणांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
मराठी तरुणांसाठी मनसे राबविणार लॉकडाऊन अजेंडा