जन्म-मृत्यू दाखला ई-मेलवर मिळणार

नागरिकांच्या सोयीसाठी आता जन्म-मृत्यू दाखले संबंधित नागरिकांना त्यांच्या ई -मेलवर पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या पूर्वी नागरी सुविधा केंद्रातून जन्ममृत्यू दाखला मिळत होता. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे हे दाखले मिळणे १ एप्रिल २०२० पासून बंद झालेले आहे. अतिशय महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला आवश्यक असल्यास पुणे महानगरपालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी कार्यालय कसबा पेठ येथील कार्यालयातून ई - मेलद्वारे स्कॅन कॉपी देण्यात येईल. त्यासाठी संबंधित नागरिकांनी आपला विनंती अर्ज birthdeathpmc@gmail.com या ई -मेलवर सादर करावा. हा अर्ज मराठी, इंग्रजी अथवा हिंदी भाषेत करावा. अर्जामध्ये आपले नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, दाखला कोणत्या आवश्यक कामाकरिता पाहिजे, त्याबाबतचा उल्लेख करावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन दोन दिवसात नमूद केलेल्या केलेल्या ई -मेलवर आयडीवर स्कॅन कॉपी पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी कृपया ०२०२५५०८४०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.