मुंबई : राज्य सरकारने चित्रिकरणाला सशर्त परवानगी दिली असली तरी अमिताभ बच्चन यांना तूर्त चित्रिकरण करता येणार नाही. कौन बनेगा करोडपतीचे सध्या प्रोमो टीव्हीवर येतायत. अमिताभ बच्चन यांनी घरातून हे प्रोमो शूट केले आणि ते टीव्हीवर चालले. राज्य सरकारने चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर कौन बनेगा करोडपती सह अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण या नियम अटींमधल्या एका अटीने मात्र अमिताभ बच्चन यांची गोची केली आहे. म्हणूनच चित्रिकरण करायचं असेल तर बच्चन साहेबांना अजून किमान दोन महिने थांबावं लागणार आहे. __केवळ अमिताभ बच्चन नव्हे, अनुपम खेर, अन्नू कपूर, नसिरुद्दीन शाह, धर्मेंद्र, शक्ती कपूर, मिथून, पंकज कपूर, जॅकी श्रॉफ, डॅनी, दिलीप ताहिल, राकेश बेदी, कबीर बेदी या कलाकारांना चित्रिकरणापासून वंचित राहावं लागेल. हिंदीसोबत मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. यात समावेश होतो दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रवी पटवर्धन, अरूण नलावडे, शिवाजी साटम, सतीश आळेकर आदी मान्यवरांनाही आता शुटिंग करता येणार नाही.
अमिताभ बच्चन यांना शुटिंग करता येणार नाही