कधी संपेल कोरोना ?

नवी दिल्ली : देशातील कोरोना संक्रण सप्टेंबरमध्ये संपू शकते. हा दावा आरोग्य महासंचालनालयाचे उपसंचालक (पब्लिक हेल्थ) डॉ. अनिल कुमार आणि सहायक उप-महासंचालक (लेप्रोसी) डॉ. रुपाली रॉय यांनी मॅथ्सच्या बॅली मॉडेलच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर केला आहे. हा स्टडी रिपोर्ट एपिडेमीलॉजी इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये मॅथमॅटिकल बेस्ड बॅली मॉडेलला आधार मानण्यात आले आहे. यानुसार कोणतीही महामारी तेव्हा संपते, जेव्हा संक्रमित व्यक्तींची संख्या आणि ठीक होणारे किंवा मरणाऱ्यांची संख्या बरोबर होते. महामारीच्या तपासणीसाठी बॅली मॉडेल रिलेटिव्ह रिमूव्हल रेट, म्हणजेच बीएमआरआरआर काढण्यात येते. हा ठीक झालेले रुग्ण किंवा मृतांच्या संख्येवरुन काढला जातो. शोधात १९ मे पर्यंतच्या आकडेवारीला सादर करण्यात आले आहे. तेव्हा देशात १,०६,४७५ संक्रमीत होते, त्यातील ४२,३०६ ठीक झाले होते. तसेच, मरणाऱ्यांची संख्या ३,३०२ होती. या आधारे बीएमआरआरआर रेट ४२% होता. डॉ. अनिल सांगतात की, "महामारी तेव्हाच संपते, जेव्हा बीएमआरआरआर १००% होतो. आजच्या तारखेला बीएमआरआरआर ५० % पर्यंत आला आहे. आमची आकडेवारी सांगते की, सप्टेंबरपर्यंत हा १०० % होईल.” ___ डॉ. अनिल सांगतात की, यूरोपच्या अनेक देशात बॅली मॉडेलने आकडेवारी काढण्यात आली. ती आकडेवारी एकदम बरोबर निघाली. परंतू, इतर अनेक घटक मुल्यांकनाच्या यशावर परिणाम करतात. त्यामुळे परिणामांची शंभर टक्के खात्री नसते.