.... अखेर शरद पवार बोलले

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर सर्व स्तरातून त्यांचा विरोध करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनेही केली होती. आता स्वतः शरद पवार यांनी याविषयावर भाष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, त्यांचं अनेक वेळा डिपॉझिट जप्त केलं आहे, कशाला बोलायचं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी निशाणा साधला आहे. सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.