ऑनलाइन वस्तू विकायची आहे - आधी हे वाचा.

पुणे : एका अॅपवरून टीव्ही विकणे बाणेर भागातील व्यक्तीला चांगलेच महागात पडले. टीव्ही खरेदीच्या बहाण्याने संपर्क साधणाऱ्या या भामट्याने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन ३९ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रचित गुप्ता (वय ३६, रा. बाणेर) यांना त्यांचा जुना टीव्ही विकायचा होता. त्यासाठी त्यांनी या अॅपवरून ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्या ठिकाणी संपर्कासाठी त्यांचा मोबाईल क्रमांकही दिला होता. एका व्यक्तीने त्यांना संपर्क साधून टीव्ही खरेदी करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. टीव्हीचे पैसे ऑनलाईन पाठविण्यासाठी त्यांच्याकडून बँकेचे डिटेल्सही घेतले, येथपर्यंत ठीक होते. परंतु त्यानंतर त्यांने व्हॉट्सअप क्रमांकावर एक क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगितला. कोड स्नॅक करताच रचित गुप्ता यांच्या खात्यामधून ३९ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर पाठविण्यात आल्याचे दिसून आले. फसवणूकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यानी पोलिसांकडे तक्रार दिली.