एका कार्यक्रमात रॉबीन उथप्पाने मांडले मत
मला आठवतंय २००९ ते २०११ हा काळा माझ्यासाठी प्रचंड खडतर होता. माझ्या आयुष्यात काय सुरु आहे आणि मी योग्य दिशेने जातोय की नाही हे देखील मला माहिती नव्हतं. आजचा दिवस ढकलायचा आणि उद्याचा दिवस कसा असेल याची वाट पहायची असं मी जगत होतो. क्रिकेटमुळे मला कधीकधी बरं वाटायचं, पण सामने नसताना ज्यावेळी मी घरी असायचो त्यावेळी प्रचंड त्रास व्हायचा. त्यावेळी घरात असताना मला कायम वाटायचं की बाल्कनीत जाऊन जीव द्यावा. पण काही गोष्टींनी मला तसं करण्यापासून थांबवलं. त्याकाळात मी स्वतःची डायरी लिहायला सुरुवात केली, यादरम्यान माणूस म्हणून माझ्यात बराच बदल झाला. राजस्थान रॉयल्सच्या Mind, Body and Soul या ऑनलाईन कार्यक्रमात उथप्पा याने आपले विचार मांडले आहेत.