एक देश एक रेशन कार्ड' योजनेला सुरूवात
करोना महामारीमध्ये स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. एक जून २०२० पासून २० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ‘एक देश एक रेशन कार्ड' योजनेला सुरूवात झाली आहे. या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल. घरगुती गॅस महागले : आजपासून १४ आणि १९ किलोंचा एलपीजी गॅस महागला आहे. रॉकेलच्या किंमतीत कपात : तेल कंपनीने रॉकेलच्या किंमतीत कपात केली आहे. आजपासून २०० रेल्वे धावणार : लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावनार आहेत. यापूर्वी १२ मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या ३० रेल्वे धावत होत्या. आता एक जूनपासून एकूण २३० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या सर्व रेल्वे मेल आणि एक्स्परेस आहेत. या रेल्वेंना वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. विमानप्रवास महागला - पेट्रोल-डीजलच्या किंमतीत वाढ : अनेक राज्यात वॅटच्या किंमती वाढवल्यामुळे पेट्रोल आणि डिजेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मिजोरम सरकारने एक जूनपासून राज्यात पेट्रोलवर २.५ टक्के आणि डिजलवर ५ टक्के वॅट लावला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रेलच्या किंमतीत वाढ झाली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्र यासारख्या राज्याने पेट्रोल-डिजेलच्या किंमतीत वाढ केली आहे. सरकारी बस धावणार : उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी परिवहन मंडळाच्या बसेस सोडण्याला मंजूरी दिली आहे. गो एअरसह इतर विमान कंपन्या देशांतर्गत सेवा सुरू करणार : स्वस्तात सेवा देणारी विमान कंपनी गो एअर देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. याशिवाय इतर काही विमानकंपनीनेही २५ मे पासून देशांतर्गत वाहतूक सुरू केली आहे.