धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या तयारीत??

धोनीने आपला परिवार आणि जवळच्या मित्रांना आपल्या निवृत्तीविषयी सांगितल्याचं कळतंय. मात्र आयपीएलमध्ये पुढील दोन हंगामतरी धोनी खेळणार आहे. त्याने अद्याप बीसीसीआयशी कोणत्याही पद्धतीने अधिकृत बोलणी केलेली नाही. पण आपल्या जवळच्या लोकांशी बोलताना त्याने आपलं मन मोकळं केलंय. योग्य वेळ येताच तो आपली निवृत्ती जाहीर करेल, धोनीच्या जवळील सुत्रांनी माहिती दिली. मात्र यंदाच्या हंगामातील आयपीएलबद्दल अंतिम निर्णय येईपर्यंत तो निवृत्तीचा निर्णय घेईल असं वाटत नाही असंही सुत्रांनी स्पष्ट केलं.