महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्यास नागरिकांचा नकार

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने या भागातील कोरोनाचा फैलाव राखण्यासाठी प्रशासनाने येथील नागरिकांची पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे मात्र या लोकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. दाटीवाटीने झोपडपट्ट्यात लोक राहत असल्याने कोरोनाचा फैलाव होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यासाठी या भागातील नागरिकांसाठी महापालिकेच्या शाळांत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र मागील ३ ते ४ दिवसांपासून नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिका शाळांमध्ये केवळ राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण आणि अंथरूण नागरिकांनी स्वतः आणावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मग तेथे जायचे कशासाठी असा सवाल नागरिक करीत आहे. तिथे गेल्यावर आपल्याला कोरोना तर होणार नाही ना ? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात संशय निर्माण होत आहे.