फरासखाना, विश्रामबाग व डेक्कन पोलिस स्टेशन अंकित सर्व पोलिस चौकीमध्ये जपनिस पद्धतीचे लिक्वीड सॅनिटायजेशन

पुणे : आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरस मुळे भीतीचे व दुःखाचे सावट आहे. प्रथम महाराष्ट्रमध्ये पुणे शहरात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती आज खऱ्या अर्थाने डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, प्रशासन, तसेच पोलिस कर्मचारी अहोरात्र झटत असून त्यांच्याही आरोग्याची काळजी करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे ओळखून जलक्रांती पुणे व बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने फरासखाना, डेक्कन, विश्रामबाग पोलिस स्टेशन व त्या अंकित पोलिस चौकीत व पोलिसांच्या गाड्या सॅनिटाइजेशन करण्यात आले. यावेळी डेक्कन पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस आयुक्त यादव साहेब,विश्रामबाग पोलिस स्टेशन चे पोलिस अधीक्षक लगड साहेब, फरासखाना पोलिस स्टेशन चे पोलिस अधीक्षक दादासाहेब चोडाप्पा तसेच पोलिस अधीक्षक कळसकर साहेब पोलीस उपस्थित होते.सदर सामाजिक उपक्रम जलक्रांती पुणे यांचे संस्थापक डॉ. तुकाराम आवळे,डॉ. संदीप शिवेकर जलक्रांती पुण्याचे अध्यक्ष माणिक टिळेकर व रवी गोंदके, सामाजिक कार्यकर्ते मनोज राऊत, अमितभाऊ कांबळे, पराग राणे व बाराबलुतेदार महासंघाचे युवाप्रदेशाध्यक्ष विशाल अनंतराव जाधव यांनी राबवला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे साहेब व माजी नगरसेवक सतिशदादा दरेकर यांचे मार्गदर्शन लाभले